Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

इस्त्रायलच्या हल्ल्यात आणखी एका अणू शास्त्रज्ञाचा मृत्यू, इराणला मोठा धक्का

गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि इराणमधील संघर्ष थांबायचं नाव घेत नाहीये. दोन्ही देशांकडून एकमेकांकडून बॉम्ब आणि मिसाईल हल्ले सुरुच आहेत. दरम्यान, आता इराणची राजधानी असलेल्या तेहराणमध्ये गिला जवळ इस्रायलने (Israel War) हल्ला केलाय. या हल्ल्यात एका अणू शास्त्रज्ञाचा मृत्यू झालाय. इस्रायल मीडिया Kan News च्या माहितीनुसार, इस्रायली अधिकाऱ्याने दावा केलाय की, हा हल्ला इस्रायच्या सैन्याने (IDF) केला आहे.

इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या स्फोटाचा उद्देश ईरानच्या अणू कार्यक्रमाशी संबंधित एका वरिष्ठ शास्त्रज्ञाला लक्ष्य करणे हा होता. प्राथमिक माहितीनुसार, तो शास्त्रज्ञ या हल्ल्यात ठार झाला आहे. मात्र, इराण सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य अद्याप आलेले नाही. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील आधीपासूनच तणावपूर्ण असलेली परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

इराणचे अध्यक्ष मसूद पेज़ेश्कियन यांनी इस्रायली हल्ल्यांबाबत तीव्र इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, शांततेचा एकमेव मार्ग म्हणजे इस्रायलने तात्काळ आणि कोणतीही अट न घालता आपले हल्ले थांबवावेत. पेज़ेश्कियन यांनी स्पष्ट केले की, जर इस्रायलकडून हल्ले सुरूच राहिले, तर इराणला आणखी कठोर प्रत्युत्तर द्यावे लागेल. त्याचबरोबर, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, इस्रायली हल्ले सुरू असताना अमेरिका किंवा कोणत्याही इतर देशासोबत यासंबंधी कोणतीही चर्चा होणार नाही.

अब्बास अराघची यांनी सांगितले की, आम्हाला सध्याच्या परिस्थितीत कोणाशीही, विशेषतः अमेरिकेशी कोणतीही चर्चा करायची नाही. उलट अमेरिका आमच्याशी संपर्क करत आहे. अमेरिकेने अनेकदा आणि गंभीर स्तरावर चर्चेचा प्रस्ताव दिला आहे, पण आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत झायनिस्ट शासनाचे (इस्रायलचे) हल्ले सुरू आहेत, तोपर्यंत कोणतीही चर्चा किंवा राजनैतिक वाटाघाटी होणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles