भंडारदऱ्यात मान्सूनच्या लवकर आगमनामुळे पर्यटकांची निराशा
नागपूर (Nagpur) :- दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला अहिल्यानगर मधील भंडारदरा रतनवाडी घाटघर आणि कळसुबाई अभयारण्य परिसरात हजारो काजव्यांचा विलक्षण दृश्य दिसतं.
काजवा महोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक या भागात गर्दी करतात. मात्र यंदा पूर्व मान्सून, अवकाळी आणि 15 दिवस आधीच मान्सूनने जोरदार हजेरी लावल्यामुळे काजव्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.
त्यामुळे यंदा पर्यटकांना भंडारदरा आणि परिसरातून नाराजीने परतावे लागत आहे. पूर्व मान्सून अवकाळी आणि आता मान्सूनमुळे यंदा अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरात काजव्यांचा विलक्षण दृश्य अजूनही घडलेलं नाही.
या परिसरामधील पर्यटनावर आधारित व्यावसायिकांचा हंगाम हातातून निसटला आहे. आता पुढील काही दिवसात वातावरण सुधारले तर काजव्यांचे दर्शन घडते का याकडे लक्ष लागलेले आहे.