बांगलादेशच्या (Bangladesh) माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात (ICT) अभियोक्ता पक्षाने गेल्या जुलै महिन्यात त्यांच्या सरकारविरोधातील उठवादरम्यान केलेली कारवाई ही मानवतेविरुद्ध गुन्हा असल्याचा ठपका ठेवला आहे. अभियोक्त्याने रविवारी याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. जर शेख हसीना यांच्या सरकारविरोधात हे आरोप सिद्ध झाले तर शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते. या दोषारोपपत्रात शेख हसीना यांच्यासह माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल आणि माजी IGP चौधरी मामून हे सह आरोपी आहेत. या खटल्याचे बांगलादेशातील टीव्हीवर थेट प्रसारण करण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणात पारदर्शकता कायम असेल
शेख हसीना यांच्यावर लावलेल्या आरोपातजुलै आणि ऑगस्ट महिन्यात देशभरात पसरलेला हिंसाचार आणि त्यानंतर पोलिसांनी केलाला गोळीबार, सामूहिक हत्याकांड करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 12 मे रोजी तपास अधिकाऱ्यांनी एक अहवाल सादर केला होता. त्यामध्ये शेख हसीना (Sheikh Hasina) यांचा या हत्याकांडामागे हात असल्याचे म्हटले होते. त्यांनीच याविषयीचे आदेश दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या न्यायाधिकरणात हा खटला सुरू आहे. ते पाकिस्तानातून स्वतंत्र झाल्यानंतर पाक सैनिकांवर खटला चालवण्यासाठी सुरू करण्यात आले होते. या न्यायाधिकरणात यापूर्वी जमात आणि BNP नेत्यांविरोधात खटले चालवण्यात आले आहेत. त्यांना मृत्यूदंड पण ठोठावण्यात आला आहे.