Monday, June 23, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

श्रीगुरुदेव धर्मदाय आयुर्वेद रुग्णालयात आता डिजीटल क्ष-किरण सेवा

अमरावती :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1944 मध्ये स्थापन केलेल्या श्रीगुरुदेव धर्मदाय आयुर्वेद रुग्णालयामध्ये रुग्णासाठी नाममात्र शुल्कामध्ये अद्यावत डिजीटल क्ष-किरण सेवेला सुरुवात झाली आहे. अद्यावत डिजीटल क्ष-किरण मशिनचे लोकार्पण अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणिस जनार्दन बोथे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

यावेळी रोगनिदान व विकृती विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ नंदकिशोर काळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज सांगळे,डॉ सुनिल बोरकर,डॉ अमोल पाटील,डॉ अजय चौधरी आतंरवासीय विद्यार्थी,रुग्णालयीन कर्मचारी व परिसरातील नागरीक उपस्थित होते.पारंपारीक क्ष-किरण तंत्रज्ञानाच्या तुलनेत डिजीटल क्ष-किरण तंत्रज्ञानाने रुग्णाच्या शरीरामध्ये मर्यादित किरणोत्सर्ग सोडुन अस्थि-सांध्याचे आजार,श्वसनसंस्थे संदर्भांतील सर्व आजाराचे निदान अचुक पध्दतीने तात्काळ केल्या जाते. यामुळे रुग्णाला अपाय होत नाही. श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयामध्ये डिजीटल क्ष-किरण सेवा रुग्णांना नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे गरजू रुग्णांनी यासेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विश्वस्त प्रमुख डॉ पी.पी.पाळेकर व श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयाचे अधिक्षक डॉ मुरलीधर खारोडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles