नागपूर (Nagpur) :- जून महिना सुरु होण्यासाठी आता दोन दिवस बाकी आहेत. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियमांमध्ये बदल केले जातात. क्रेडिट कार्ड एलपीजी, ईपीएफओ, आधार कार्ड आणि सीएनजी पीएनजी दरासंदर्भात काही बदल झालेले पाहायला मिळू शकतात. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दर बदल पाहायला मिळू शकतात. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात बदल होऊ शकतात. क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम देखील बदलले जाणार आहे.
एलपीजी सिलेंडरचे दर
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas) दरात बदल केले जातात. मे महिन्यात ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून घरगुती वापराच्या सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. तर, व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात 17 रुपयांची कपात करण्यात आली होती.
1 जून 2025 ला हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा मिळू शकतो किंवा खर्च वाढवणारा देखील ठरू शकतो. ऑईल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्य दरासह एअर टर्बाईन फ्यूलचे दर दुरुस्तीसह जाहीर केले जातात. मे महिन्यात यामध्ये कपात करण्यात आली होती. जूनमध्ये काय बदल होतात ते पाहावं लागेल. याशिवाय सीएनजी आणि पीएनजीचे दर नवे देखील जाहीर केले जाऊ शकतात.
क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम
कोटक महिंद्रा बँकेचं क्रेडिट कार्ड तम्ही वापरत असाल तुमच्यासाठी धक्कादायक अपडेट आहे. ऑटो डेबिट ट्राझॅक्शन अयशस्वी झालं तर बँकेकडून 2 टक्के बाऊंस चार्ज लागू केले जातील. किमान 450 रुपये आणि कमाल 5000 रुपये आकारले जातील. बँकेच्या वेबसाईट नुसार क्रेडिट कार्डवरील मंथली फायनान्स चार्ज वाढवला जाऊ शकतो. सध्या तो दर 3.50 टक्के असून वाढवून 3.75 टक्के केला जाऊ शकतो.
EPFO 3.0 लागू होण्याची शक्यता
केंद्र सरकार EPFO चं नवं वर्जन EPFO 3.0 लाँच केलं जाऊ शकतं. काही दिवसांपूर्वी केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवीय यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन ईपीएफओ 3.0 चे फायदे आणि बदलांबाबत माहिती दिली होती. ईपीएफओचं नव 3.0 वर्जन लाँच झाल्यास देशातील 7 कोटींहून अधिक खातेदारांना एटीएममधून पीएफचे पैसे काढता येतील.
आधार अपडेट
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत 14 जूनला संपणार आहे. त्यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपयांचं शुल्क द्यावं लागणार आहे. म्हणजेच 14 जूनपूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करुन घ्यावं लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क लागणार आहे.