Saturday, August 2, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

इतिहासाच्या पुस्तकातून मुघल इतिहास हटवला; महाकुंभ, प्रयागराजचा समावेश

भारतीय राजवंशांवरील प्रकरणांचा समावेश

🔸 NCERT ने इयत्ता 7 वीच्या सामाजिक विज्ञानाच्या पुस्तकात मोठे बदल केले असून पुस्तकातून मुघल साम्राज्य आणि दिल्ली सल्तनतवरील प्रकरणे काढून टाकण्यात आली आहेत. आता Exploring Society: India and Beyond या पुस्तकात मौर्य, मगध, शुंग आणि सातवाहन यासारख्या प्राचीन भारतीय राजवंशांवरील नवीन प्रकरणे जोडण्यात आली आहेत.

🔸 तसेच भारतातील धार्मिक स्थळे आणि तीर्थक्षेत्रांचा How the Land Becomes Sacred या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये चार धाम यात्रा, 12 ज्योतिर्लिंगे आणि शक्तीपीठे यांचा समावेश आहे. अलीकडे प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या 66 कोटी भाविकांचा उल्लेखही पुस्तकात आहे. त्याचबरोबर “मेक इन इंडिया” आणि “बेटी बचाओ, बेटी पढाओ” सारख्या शासकीय योजनांचा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.

🔸 पाठ्यपुस्तकांमधील या बदलांवर विरोधी पक्षांनी टीका केली असून ‘भगवाकरण’ करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. गेल्या वर्षी NCERT चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी एका मुलाखतीत, मुलांना दंगलींबद्दल शिकवल्यास ते नकारात्मक गोष्टी शिकतील आणि तशाच प्रकारचे नागरिक बनतील, असं वक्तव्य केलं होतं. सुधारित बदलांचा उद्देश भारताच्या परंपरा, ज्ञान प्रणाली आणि स्थानिक संदर्भांना प्राधान्य देणे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles