Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

10 हजारांचा दंड ठोठावताच उदित नारायण कोर्टात हजर

मुंबई (Mumbai) :- बॉलिवूड गायक उदित नारायण झा शुक्रवारी बिहारमधील सुपौल येथील कुटुंब न्यायालयात हजर झाले. त्यांची पहिली पत्नी रंजना यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणात ते व्यक्तिशः हजर झाले. यापूर्वी त्यांना अनेकदा सांगूनही ते हजर झाले नव्हते. त्यामुळे कोर्टाने त्यांना 10 हजारांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर ते कोर्टासमोर हजर झाले. कुटुंब न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहुल उपाध्याय यांनी त्यांना 28 जानेवारी 2025 रोजीपर्यंत उत्तर दाखल करण्यास मुदत दिली होती. सुनावणीदरम्यान कोर्टाने रंजना झा आणि उदित नारायण यांची बाजू ऐकली. दोघांचे समुपदेशन केले. उदित नारायण यांनी भविष्यात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी घेण्याची विनंत केली. उदित नारायण यांनी कोणतीही तडजोड करण्यास नकार देत केस लढण्याचे ठरवल्याची माहिती त्यांची पहिली पत्नी रंजना झा यांनी दिली.

गायक उदित नारायण (Udit Narayan) यांच्या मते, बिहार राज्य महिला आयोग, पाटणा यांच्यासमोर दोन्ही पक्षात तडजोड झाली. महिला आयोगाने 4 जुलै 2023 रोजी पहिल्या पत्नीचा अर्ज फेटाळला होता. उदित नारायण हे पत्नाला प्रति महिना 15 हजार रुपये गुजारा भत्ता, पोटगी देत असल्याचे महिला आयोगासमोर आले होते. जानेवारी 2021 पासून ही रक्कम 15 हजाराहून 25 हजार रुपये प्रति महा करण्यात आली होती. उदित नारायण अजूनही रक्कम देत आहेत. तर रंजना यांना एक कोटींचे घर सुद्धा देण्यात आले आहे.

एक शेतीचा तुकडा आहे. त्यावर एक छोटी खोली बांधण्यात आली आहे. रंजना यांनी ही खोली भाड्याने दिली आहे. त्यातून त्यांना दरमहा 6 हजार रुपये किराया मिळतो. तर उदित यांच्याकडून 25 लाख रुपयांचे दागिने देण्यात आले आहेत. एक जमीन रंजना यांना देण्यात आली होती. ती त्यांनी विक्री केली. पाटणा येथे एक फ्लॅट खरेदी केला आहे. पण जमीन मालक आणि विकासक यांच्यातील वादामुळे त्याचा ताबा मिळू शकला नाही. आपल्याकडून पैसे वसूल करण्यासाठी रंजना यांनी कुटुंब न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचा आरोप उदित यांनी केला.

दरम्यान रंजना झा यांनी उतारवयात आता पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. औषधे आणि देखभालीसाठी पतीची गरज असल्याची बाजू त्यांनी मांडली. तर उदित नारायण यांनी पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles