धुळे (Dhule) :- अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून लाखोंचा गुटखा पकडला. ही कारवाई शुक्रवारी दीड वाजेच्या सुमारास मौलवीगंज भागात घडली. जप्त केलेला गुटख्याचा साठा अंदाजे 10 लाखांचा असण्याची शक्यता आहे. दुपारी उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरु होते.
नाशिक येथील अन्न व औषध विभागाला धुळ्यातील घड्याळवाली मशिदजवळ असलेल्या मौलवीगंज भागातील मदिना स्वीट दुकानात महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला विमल गुटखाचा साठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच धुळ्यातील अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला असता या ठिकाणी लपवून ठेवलेला विमल गुटखाचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला गुटख्याचा माल 10 लाखांचा असण्याची शक्यता संबंधित विभागाने वर्तवली असून या प्रकरणी आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरु आहे.
Dhule wikipedia
Dhule famous for
Dhule Corporation
Dhule Map
Dhule famous food
Dhule gov in
Dhule famous places
Where is Dhule in Maharashtra