Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Budget 2025 : आता ‘कर’ नाही अन् डरही नाही…

* केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्र सरकारचा पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
* केंद्रीय अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम
* लघु उद्योगांना दहा लाखांचे क्रेडिट कार्ड देणार
* स्टार्ट अप उद्योगांसाठी २० लाखांचे कर्ज
* उत्पादकांसाठी नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशनची स्थापना करणार
* देशात पाच नॅशनल सेंटर्स फाॅर एक्सलन्स स्थापन करून क्षमता वृद्धीसाठी प्रयत्न करणार
* देशातील पाच आयआयटी मध्ये अधिक अत्याधुनिक सुविधा उभारणार
* प्रत्येक जिल्हा रुग्णालयात डे केअर कॅन्सर केंद्र उभारणार
* पाच वर्षांत मेडिकलच्या ७५ हजार जागा वाढवणार
* ऑनलाईन कंटेंट निर्मात्यांसाठी ई श्रम अंतर्गत ओळख
* जल जीवन मिशन साठी निधी देणार
* राज्य सरकारांना विकास कामांसाठी बिनव्याजी कर्ज देणार
*देशात वैज्ञानिक संशोधन, जहाज बांधणी, न्युक्लिअर एनर्जी कार्याला प्रोत्साहन देणार
* मध्यमवर्गीयांच्या हवाई वाहतूक व्यवस्थेसाठी उडाण योजना. छोटी १२० शहरं हवाई वाहतुकीने जोडणार
* खाजगी उद्योगांठी पी एम गतीशील पोर्टल
* पर्यटन विकासासाठी केंद्र उभारणार. वैद्यकीय व धार्मिक टुरीझमला चालना देणार. भगवान गौतम बुद्धांची ठिकाणं टुरिझम साठी विकसित करणार
* निर्यात धोरणात अमुलाग्र बदल करून माल निर्यातासाठी सुविधा उभारणार
* पुढील आठवड्यात नवीन आयकर बील सादर करणार
* ग्रामीण भागातील बचत गटातील नागरिकांना आर्थिक मदतीसाठी धोरण
* यंदाच्या आर्थिक वर्षात जीडीपीच्या ४.४ टक्के तूट अपेक्षित
* वर्ष २०२५ साठी कॅपेक्स १०.१८ लाख कोटी
* आयकर नियम सोपे करणार
* सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या त्रिसूत्री वर काम करणार
* किरायाच्या टीडीएस ची मर्यादा २.४ वरून ६ लाखांवर

* १२ लाखांपर्यंत आयकर लागणार नाही.
* ८ ते १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर
* २४ लाखांवर ३० टक्के आयकर
* १५ ते २० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के आयकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles