नागपूर (Nagpur) :- आपल्या राष्ट्राचा गौरवशाली ७६ वा प्रजासत्ताक दिन. नागपूरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क येथे मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला.
“या विशेष कार्यक्रमात नागपूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हा सोहळा अतिशय भव्य स्वरूपात पार पडला.
“कार्यक्रमात नागपूरातील नामांकित शाळा प्रहार मिल्ट्री स्कूल तसेच इतर शाळांच्या NCC परेडनी उपस्थितांचे लक्ष वेधले. शिस्तबद्ध पावलांनी केलेली परेड प्रत्येकाला अभिमान वाटायला लावणारी होती . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकारांचे सादरीकरण केले. विशेषतः आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या आदिवासी नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात खासदार शंकुमार बर्वे , विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री , पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल , जिल्ह्याधिकारी डॉ. विपीन इटनकर व इतर मान्यवर नागपूर जिल्ह्यातील अधिकारी , उच्चन्यायालयातील न्यायमूर्ती उपस्थित होते
या सोहळ्याने नागपूरकरांच्या देशभक्तीला नवा उलगडा दिला. हा दिवस आपल्या संविधानाच्या मूल्यांचा आदर करत, एकता आणि समृद्धीचा संदेश देणारा ठरला.