Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

नवीन घर घेताय, नवीन घराची नोंदणी करताय; मग लक्षात घ्या या सूचना

बहुतेकजण आयुष्यभराची कमाई घालून घर घेत असतात. या गुंतवणुकीत फसवणूक होऊ नये म्हणून महारेराने घरखरेदीदारांना कायदेशीररित्या सक्षम करणारे अनेक  निर्णय घेतलेले आहेत. आता महारेराने घर खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत (Guidelines issued for house purchase by MahaRERA). या सूचनांनुसार पुरेपूर काळजी घेतल्यास सुरक्षित व संरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.

संबंधित गृहनिर्माण प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत असायला हवा, हे तर अत्यावश्यक आहेच. याशिवाय संबंधित प्रकल्पावर न्यायालयात काही खटले प्रलंबित आहेत का ? (  Litigation) असल्यास कुठली ?  त्याची सद्यस्थिती काय ? एकूण तपशील काय ? कुठला ‘बोजा’ (Encumbrance )  या प्रकल्पावर आहे का ?  प्रकल्पाचे प्रारंभ प्रमाणपत्र (CC) किती मजल्यांसाठी आहे, संबंधित स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून  दिल्या जाणाऱ्या प्रकल्प मंजुरीच्या आराखड्यात ( Approved Plan) समग्र प्रकल्पात कशाकशाला मंजुरी दिलेली आहे या बाबींची घरखरेदीदाराने प्रत्यक्ष व्यवहारापूर्वी खात्री करून घेणे अत्यावश्यक आहे. महारेराने नवीन गृहनिर्माण प्रकल्पाची नोंदणी करताना हा सर्व तपशील ,पूरक कागदपत्रांसह देणे बंधनकारक केलेला आहे. संबंधित प्रकल्पाच्या महारेरा  नोंदणीक्रमांकाच्या मदतीने महारेराच्या संकेतस्थळावर  तो सर्वांसाठी उपलब्ध आहे.

घरखरेदीदार आणि प्रवर्तक यांच्यातील घर विक्री करार (Agreement for Sale) आणि घर नोंदणी केल्याचे पत्र ( Allotment letter) हे महारेराने प्रामाणिकृत केलेल्या मसुद्यानुसारच द्यावे, असे बंधन प्रवर्तकांवर घातलेले आहे. घर खरेदी करारात दैवी आपत्ती ( Force Majeure) , चटई क्षेत्र, ( Carpet Area ) दोष दयित्व कालावधी ( Defect liability period) आणि हस्तांतरण करार (Conveyance deed  ) या बाबी अपरिवर्तनीय ( non- negotiable) राहतील. त्यात बदल करता येणार नाही. नोंदणी पत्र  देताना सदनिका क्रमांक,  चटई क्षेत्र,  प्रकल्प पूर्णत्वाचा अपेक्षित दिनांक  याचा तपशील नोंदवणे यात बंधनकारक करण्यात आलेला आहे. एवढेच नाही प्रवर्तकाने घर खरेदीकरारात आणि नोंदणीपत्रात स्वतंत्र जोडपत्रात पार्किंग आणि आश्वासित सोयी सुविधांचा समग्र तपशील देणेही बंधनकारक केलेले आहे. यात पार्किंग आच्छादित, खुले, मेकॅनिकल, गॅरेज कसे राहील हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. शिवाय या पार्किंगची लांबी, रूंदी, उंची,  प्रकल्पस्थळी पार्किंगची प्रत्यक्ष जागा हेही या जोडपत्रात नोंदवणे आवश्यक आहे. प्रकल्पात आश्वासित केलेल्या विविध सोयी, सुविधा कधी उपलब्ध होणार,  सोसायटीला कधी हस्तांतरीत होणार हेही या जोडपत्रात नमूद करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles