अहमदनगर : देशात गुणवत्तेने अग्रमानांकित ठरलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मधील आयईईई विद्यार्थी विभागास अमेरिकन व्यवसाय संघटनेचा संशोधनासाठीचा प्लॅटिनम पुरस्कार मिळाला आहे. मुंबई येथे द इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर या संस्थेने हा पुरस्कार दिला.मुंबई विभागाचे अध्यक्ष आनंद घारपुरे यांच्या हस्ते विभाग प्रमुख डॉ.आर.पी.लबडे व डॉ.संदीप राहणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीसाठी दरवर्षी द इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स यांच्यावतीने इन इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी,इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी व इतर संबंधित विषयांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व विद्यार्थ्यांना विविध पुरस्काराने गौरवले जाते.अमेरिकन व्यावसायिक संघटना असलेल्या या या संस्थेचे मुख्य कार्यालय हे न्यूयॉर्क येथे आहे.अमृतवाहिनीतील विद्यार्थ्यांनी मागील वर्षी केलेल्या नाविन्य पूर्ण व नियमित उपक्रमाबद्दल हा प्लॅटिनम पुरस्कार मिळाला आहे.या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉ सुधीर तांबे,विश्वस्त शरयू देशमुख,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,डॉ.जे.बी.गुरव,प्राचार्य डॉ.एम.ए.वेंकटेश,रजिस्टर प्रा.विजय वाघे यांनी अभिनंदन केले आहे.