Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढणार

नवी दिल्ली, 11 डिसेंबर  : अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची माहिती पुढे आली आहे. आम आदमी पार्टी (आप) काँग्रेसशी युती करणार नसल्याचे केजरीवाल यांनी आज, बुधवारी अधिकृतपणे जाहीर केले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट शेअर करत स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

यासंदर्भातील आपल्या पोस्टमध्ये केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पार्टी ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे. काँग्रेससोबत कोणतीही युती होण्याची शक्यता नाही. यापूर्वी 7 डिसेंबर रोजी दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी आम आदमी पार्टी (आप) आणि राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर राष्ट्रीय राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या “बिघडलेल्या” परिस्थितीला जबाबदार असल्याची टीका केली होती. केजरीवाल यांनी ज्याप्रमाणे निर्भया प्रकरणाच्या वेळी माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा राजीनामा मागितला होता. त्याचप्रमाणे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा राजीनामा मागितला पाहिजे, अशी मागणीही देवेंद्र यादव यांनी केली. दिल्ली काँग्रेस अध्यक्षांनी पुढे आरोप केला की, महिलांना टोळीयुद्ध, गोळीबार, खून, बलात्कार, छळ आणि छेडछाडीच्या घटनांसह वाढत्या गुन्ह्यांचा सामना करावा लागत आहे.

काँग्रेसच्या या टीकेनंतर केजरीवाल यांनी काँग्रेसशी निवडणुकीत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच केजरीवाल यांच्या ट्विट नंतर आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी सांगितले की, यापूर्वी देखील आम्ही स्वबळावर दिल्लीत निवडणूक लढलो आणि प्रचंड बहुमताने विजयी झालो. त्यामुळे निवडणुकीत कुणाशी युती करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे चढ्ढा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles