प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला!
वायनाड (Wayanad) :- वायनाड लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपा कोणाला मैदानात उतरवणार याबद्दल उत्सुकता होती. अखेर भाजपाकडूनवायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला असून, नव्या हरिदास यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीची चर्चा राहुल गांधींनी या मतदारसंघाचा राजीनामा दिल्यापासून सुरू होती. काँग्रेसने गांधी कुटुंबातीलच व्यक्तीलाच वायनाडमधून उमेदवारी दिल्याने भाजपा कोणाला उमेदवारी देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. भाजपाने नव्या हरिदास यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नव्या हरिदास विरुद्ध प्रियंका गांधी अशी लढत होणार, हे स्पष्ट झालं आहे.
नाव्या हरिदास 39 वर्षीय मॅकेनिकल इंजिनिअर आहे. त्यांचे पती शोभीन श्याम आहे. नाव्या यांनी केएमसीटी इंजिनियरिंग कॉलेजमधून 2007 मध्ये बी.टेक केले. त्या भाजप महिला मोर्चाचे राज्य महासचिव आहेत. नाव्या 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरल्या होत्या. परंतु त्यांचा पराभव झाला होता. 2021 मध्ये कोझीकोड दक्षिण विधानसभा मतदार संघातून लढताना त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या.
विधानसभा निवडणुकीत इंडियन नॅशनल लीगचे अहमद देवरकोविल यांना इंडियन युनियन मुस्लिम लीगचे नूरबीना राशिद यांनी पराभूत केले होते. अहमद दवरकोविल यांना 52,557 मते मिळाली होती. नाव्या यांना 24,873 मते मिळाली होती. वायनाड लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.