Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Pune News : हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू

पुणे (Pune) 02 ऑक्टोबर :-  पुण्याच्या बावधान परिसरात खासगी हेलिकॉप्टर कोसळून 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, बुधवारी सकाळी घडली. मृतांमध्ये 2 वैमानिक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे. यासंदर्भात हिंजवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडहून आज, बुधवारी सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डान केले. त्यानंतर काही वेळातच हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन बावधान परिसरात कोसळले. सध्या पुण्यात धुक्याचे वातावरण असून त्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागून ते भस्मसात झाले. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 वैमानिक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे. दरम्यान पोलिसांसोबतच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून हिंजवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या नेतृत्वातील पथक या अपघाताची चौकशी करीत आहेत.

Pune district wikipedia
Pune News today Marathi
Pune map
What is Pune famous for
Pune city area
Pune district Name
Pune city area in sq km
pune.gov.in recruitment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles