Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

मोदींनी घेतली32 दिवसांत दुसऱ्यांदा झेलेन्स्की यांची भेट

युद्ध थांबवण्याबाबत नेत्यांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. 32 दिवसांत दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट होती. 23 ऑगस्ट रोजी युक्रेन दौऱ्यावर असताना मोदींनी झेलेन्स्की यांची भेट घेतली होती.मोदींनी झेलेन्स्की यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये झालेल्या भेटीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

त्यांनी लिहिले- द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी युक्रेन भेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.त्याचवेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले की, मोदींनी झेलेन्स्की यांना सांगितले आहे की, ते रशिया-युक्रेन युद्धाबाबत अनेक देशांच्या नेत्यांशी बोलत राहतात. युद्धविरामाचा मार्ग लवकर सापडला पाहिजे, असे सर्वांचे मत आहे.युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी आभार मानले. झेलेन्स्की यांनीही मोदींच्या युक्रेन भेटीचे कौतुक केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles