Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

उत्तराखंड : भूस्खलनातील मृतकांची संख्या 5 झाली

ढिगाऱ्यातून आणखी 4 भाविकांचे मृतदेह बाहेर काढले

रुद्रप्रयाग:- उत्तराखंडच्या (Uttarakhand) गौरीकुंड आणि सोनप्रयाग दरम्यान सोमवारी संध्याकाळी 7.25 वाजता (Gaurikund landslide accident) भूस्खलन होऊन भाविकांचा एक गट अडकला होता. राज्य आपत्ती निवारण दलाने (एसडीआरएफ) आज, मंगळवारी ढिगाऱ्यातून आणखी 4 मृतदेह बाहेर काढले. त्यामुळे मृतांची संख्या आता 5 झाली आहे.

केदारनाथहून परतणाऱ्या भाविकांचा एक गट सोमवारी संध्याकाळी झालेल्या भूस्खलनात अडकला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांनी शोध आणि बचाव मोहीम हाती घेतली. यादरम्यान सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील एका भाविकाचा मृतदेह सापडला. तर 3 भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. खराब हवामान आणि डोंगरावरून सतत दरड कोसळत असल्याने सोमवारी रात्री बचावकार्य थांबवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. या दरम्यान ढिगाऱ्यातून ३ महिलांसह आणखी 4 भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले,” अशी माहिती रुद्रप्रयागचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एनके राजवार यांनी दिली आहे. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील दुर्गाबाई खापर, नेपाळमधील धनवा जिल्ह्यातील वैदेही येथील तितली देवी; मध्य प्रदेशातील धार येथील समनबाई आणि गुजरातच्या सुरत येथील भरत भाई निरालाल यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles