भाजपचे धैर्यशील पाटील तर राष्ट्रवादीच्या नितीन पाटलांची बिनविरोध निवड
राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आलेल्या जागे वर नितीन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांच्या निवडणुकीची चर्चा होती.
आता या दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन पाटील आणि भाजपाचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याव्यतिरिक्त अन्य दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण शेवटी नितीन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.