Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

भारत बंद : नागपुरात ठिकठिकाणी आंदोलन

 चंद्रपुरात धरणे आंदोलन

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले. नागपुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. बसपा, बीआरएसपी, रिपाइं, पीरिपासह विविध राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटना या बंदच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या होत्या.

आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा १ तारखेला निर्णय येताच याविरोधात देशभरात असंतोष पसरला होता. त्यानुसार काही सामाजिक संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. बुधवारी शहरात सकाळपासूनच इंदोरा चौक,कमाल चौक, त्रिशरण चौक, संविधान चौकासह विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शहराच्या विविध भागातील संघटनांनी रॅली काढली. संविधान चौकात या रॅलीचे जाहीर सभेत रूपांत झाले. संविधान चौकात मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली होती.

आरक्षण वाचवा कृती समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. एससी आणि एसटी आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रीम लेअरची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी आरक्षण बचाव कृती समितीने एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) 7 न्यायाधीश एस.सी. आणि एस.टी. आरक्षणाचे उपवर्गीकरण करून क्रीम लेअरची अट घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. सामाजिक न्याय आणि नैतिक न्यायाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय त्या वर्गाच्या हितासाठी अन्यायकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जनतेत संताप व्यक्त होत आहे

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आरक्षणाचे अ, ब, क आणि ड असे उपवर्गीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. आरक्षणाच्या संदर्भात कोणत्याही जातीचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार संसदेला नाही, न्यायालयांना नाही. राष्ट्रपती आणि संसदेच्या अधिकारात हस्तक्षेप करणे हे भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४१ आणि ३४२ चे उल्लंघन आहे. एससी एसटी आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रीम लेअरची अट रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

धरणे आंदोलन समता सैनिक दल, ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी, बहुजन कर्मचारी महासंघ बाणाई, अखिल भारतीय आदिवासी कर्मचारी महासंघ, मा. फुले डॉ.आंबेडकर विचार संवर्धन समिती, थेंबा ग्रुप, भीम आर्मी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वकील संघ, वेकोलि एससी, एसटी, ओबीसी परिषद, रिपब्लिक टीचर्स स्टाफ युनियन, बहुजन युवा कृती समिती या वेळी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles