नागपूर (Nagpur) :- हिंदी मोर भवन येथील अर्पण हॉल, सीताबर्डी येथे स्थानीय “सूर मिलन” ग्रुपचा पहिला वाद्य वृंदासहित संगीतमय कार्यक्रम “उडान – एक प्रयास” यशस्वीपणे पार पडला.
या कार्यक्रमाला जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन (Dr. Praveen Mahajan) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय, शिक्षण विभागाचे श्री झोडे आणि हास्य कवी श्री राजाभाऊ धर्माधिकारी यांनीही कार्यक्रमाला गौरव प्रदान केला. सर्व मान्यवरांनी सूर मिलन ग्रुपच्या गायकांच्या प्रतिभेचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन श्री. मकरंद बक्षी यांनी केले असून, संकल्पना सौ. संगीता बक्षी यांची होती. मकरंद बक्षी, भालचंद्र बोधनकर, वैशाली प्रयागी, प्राजक्ता ठोंबरे, अंजली जोशी, दिलीप बामनोटे, श्रीकृष्ण मंडपे, डॉ. अश्लेष मुरकुटे, डॉ. अरविंद काळे, कमलेश टाहील्यानी, निखिल वझलवार, सचिन सांबरे, डॉ. श्वेता नानोटी, सपना कुरळकर, मोहन खंडाळकर, डॉ. सुशील गादेवार, पल्लवी दाउतखानी, डॉ. मानसी कान्हे, निलिमा कदम आणि संदीप जावळे यांनी आपल्या सुमधुर आवाजात रसिकांचे मनोरंजन केले.
पंकज यादव (ढोलक), नितीन अहिरे (गिटार), मधुर बक्षी आणि प्रद्युम्न शिंगोटे (तबला), यश नवनागे (मायनर), दर्शनी पाखरे (कीबोर्ड) आणि श्रेया पाखरे (ऑक्टो पॅड) या वाद्य कलाकारांनी गायकांना उत्तम साथ दिली.
या प्रसंगी नवोदित वादकांचा सर्व गायकांकडून स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संगीत नियोजन नरेंद्र पाखरे यांनी केले होते आणि सौ. अश्विनी मंग्रुळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.