Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

BJP ला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

BJP ला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

भारतीय जनता पार्टीचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल याबद्दलची उत्सुकता अद्यापही कायम आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर राष्ट्रीय अध्यक्ष निवडणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भाजपा उत्सुक आहे. असं असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये भाजपचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष महिला किंवा ओबीसी असावा यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. एखाद्या महिलेकडे भाजपाचे अध्यक्षपद सोपवलं जावं अशा अनुषंगाने चर्चा झाली. दिल्लीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये ही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी भाजपा आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांची 5 तास बैठक झाली.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. पण अद्याप नवीन अध्यक्षाच्या नावावर मोहर उमटली नाही. या मुद्यावर भाजपची नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. लोकसभेतील नाराजी पाहता, भाजपने अध्यक्ष पदासाठी नवीन खेळी खेळल्याची चर्चा आहे. पक्षाची कमान ओबीसी अथवा महिलेच्या हाती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात अधिकृतपणे कोणतीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

———-

मनोज जरांगेंची शांतता रॅली आज नाशकात

छगन भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात शांतता रॅली काढली आहे. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. .

———–

भाजपलाही आठवल्या लाडक्या बहिणी

राखी पौर्णिमेला फडणवीस होणार ‘देवाभाऊ

येत्या राखी पौर्णिमाला 18 ऑगस्ट रोजी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री फडणवीस “लाडक्या बहिणींचा देवाभाऊ” या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत”.लाडक्या बहिणींचा देवभाऊ या उपक्रमाने फडणवीस महिलांशी बोलणार आहेत या बाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली
————–

सुप्रीम कोर्टात पतंजलीवरील अवमानाचा खटला बंद

बाबा रामदेव-आचार्य बाळकृष्ण यांची स्वीकारली माफी

पतंजली आयुर्वेद आणि योगगुरू स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील न्यायालयाचा अवमान खटला बंद केला आहे. न्यायालयाने या दोघांनाही कडक ताकीद देताना सांगितले की, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून काही केले तर न्यायालय कठोर शिक्षा देईल. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने मंगळवारी (13 ऑगस्ट) हा निकाल दिला. 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अवमान नोटीसवरील निर्णय राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टाने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी केली होती, ज्यामध्ये कोविड लसीकरण आणि ॲलोपॅथीची बदनामी केल्याचा आरोप होता.

————
दादरमध्ये नंदीग्राम एक्स्प्रेसच्या शौचालयात मृत्यू

शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल

नंदीग्राम एक्स्प्रेसच्या शौचालयात 35 वर्षीय प्रवाशाचा मृतदेह सापडल्यानंतर दादर रेल्वे स्थानकावर तीन दिवसांनी दादर पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब साबळे असे मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो घाटकोपर येथील रहिवासी होता. साबळे यांनी नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles