Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

शरद पवारांची यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

शरद पवारांची यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली

मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

शरद पवार यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली. यावेळी मराठा आंदोलकांकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार यांच्या गाडीच्या समोर येऊन काही मराठा आंदोलक घोषणा देत होते. शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत. या वेळी आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवली होती. शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत. टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवली आहे. शरद पवार यांची गाडी कुर्डूवाडी जवळ अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. सकाळी 11 वाजता बार्शीत शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा तसेच नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 पर्यंत पवार हे बार्शीत आहेत. संध्याकाळी सोलापूर शहरातील लिमयेवाडी येथे भटके, विमुक्त, ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलाय. त्याला ही उपस्थित राहतील.

———-

माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन

वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. नटवर सिंह हे अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर दिल्लीजवळील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय होते आणि त्यांच्या कार्यालयाशी संलग्न होते.मुत्सद्देगिरीतील अनुभवाचा खजिना आपल्या राजकीय कारकीर्दीत आणणारे ते करिअर डिप्लोमॅट होते आणि शिवाजी महाराजांच्या जीवनापासून ते परराष्ट्र व्यवहारातील बारकावे या विषयांवरील विपुल लेखक होते.

————

उद्धव ठाकरेंना ठाण्यात मोठा धक्का

अनिता बिर्जे शिंदे गटात प्रवेश करणार

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन मेळावा पार पडला. यावेळी मोठा राडा झाला. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा केला. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्या, नारळ आणि शेण फेकण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकण्यात आले आहे. दरम्यान, ठाण्यात मेळावा सुरु असतानाच उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसलाय. उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील मेळावा सुरू असतानाच शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. दिवंगत आनंद दिघे यांच्या काळापासून ठाकरेंसोबत असलेल्या अनिता बिरजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


तब्बल 4000 मृतदेह चोरुन हाडांची विक्री

18 टन मानवी हाडे जप्त

चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनमधील दफनभूमी तसेच वैद्यकीय प्रयोगशाळांमधून 4 हजाराहून अधिक मृतदेह चोरुन त्यातील हाडे विकण्यात आली आहेत. दंत रोपणासाठी ही हाडे विकण्यात आली आहेत. चीनमधील यंत्रणांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहेमिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील काही टोळ्या मडतदेह चोरत असल्याचे समोर आले आहे. मृतदेह चोरुन हाडांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. शांक्सी प्रांतातील तैअुयान येथील पोलिसांनी केलेल्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. यातून या टोळ्या मोठा पैसा कमवत असल्याचं देखील समोर आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी तब्बल 18 टन मानवी हाडे व त्यापासून बनवलेली 35 हजार उत्पादने नुकतीच जप्त केली आहेत.

——-

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात अवैध सोनोग्राफीचा सुळसुळाट

अवैध सोनोग्राफी सेंटरवर पडली धाड

गेल्या आठवड्यात बुलढाणा शल्य चिकित्सक यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने मेहकर येथील अवैध सोनोग्राफी सेंटरवर धाड टाकली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे याठिकाणी अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचणी सुरू असल्याची माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली होती. यात अवैध सोनोग्राफी होतं असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी PCPNDT कायद्या अंतर्गत गुन्हे दखल केले असून आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटकही केली आहे. या अवैध सोनोग्राफी सेंटर प्रकरणात विशेष बाब म्हणजे, या प्रकरणात ज्यांना अटक केली आहे या तिघांचाही वैद्यकीय क्षेत्राशी कुठलाही संबंध नाही. मग शल्य चिकित्सक आणि पोलिसांनी अटक केलेले ते तिघे कोण? यावर अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या सोनोग्राफी सेंटरवर गर्भलिंग निदान करण्यात येत होत ते कोण करत होतं? वैद्यकीय क्षेत्राशी संबंध नसलेल्या मुख्य आरोपी शिवा गरड याला गर्भलिंग निदान चाचणी कशी करायची हे कुणी शिकविलं? या सोनोग्राफी सेंटरवर ग्राहक पाठविणारे डॉक्टर्स कोण? यात गुंतलेल्या डॉक्टरांची चौकशी पोलीस कधी करणार? असे अनेक सवाल आता उपस्थित राहत आहेत.

——-

हिंडनबर्गचा मोर्चा आता सेबीच्या अध्यक्षांकडे

माधवी पुरी यांच्यावर गंभीर आरोप

हिंडनबर्ग रिसर्चने सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच ( यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अदानी घोटाळ्याशी संबंध असलेल्या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे. मात्र, माधवी पुरी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व आरोप बिनबुडाचे आणि नाराधार असल्याचे पुरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हिंडनबर्ग रिसर्चच्या म्हणण्यानुसार, माधवी पुरी आणि त्यांचे पतीने मॉरिशस आणि बर्म्युडामधील ऑफशोअर फंडामध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles