उसराहर परिसरातील घटना
उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर, उसराहर परिसरात एक अनियंत्रित कार रस्त्याच्या पलीकडे गेली आणि रायबरेलीहून येणाऱ्या स्लीपर बसला धडकली. त्यानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या 20 फूट खाली खड्ड्यात पडून 7 जण ठार तर 40 जखमी झाले. पोलीस दलाने मानवी साखळी करून जखमींना बाहेर काढले. नागालँड क्रमांकाची स्लीपर बस 60 प्रवासी घेऊन रायबरेलीहून दिल्लीला जात होती, तर दुसरीकडे आग्राहून लखनऊला जाणारी कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. अनियंत्रित कार दुभाजक ओलांडून या रस्त्यावर आली. अचानक समोरून आलेल्या कारला वाचवण्यासाठी बसचालक साईडला गेला, मात्र कारला धडक बसल्याने दोन्ही वाहने जोराचा आवाज करत रस्त्याच्या (Lucknow-Agra Express) कडेला सुमारे 20 फूट खाली खड्ड्यात पडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले