Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली

राज ठाकरेंवर टीका केल्याने हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांंच्यावर टीका केल्यानं मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. अकोल्यात हा प्रकार घडला. राज ठाकरे यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र, मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
———–

उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन हा एकप्रकारचा डाव

मनोज जरांगेंचं प्रवीण दरेकरांवर टीकास्त्र

वैयक्तिक कोणाच्याही दारात आपण आंदोलन करु शकतो. पण मराठ्यांचं कोणतंही आंदोलन सुरु नसताना तुम्ही आंदोलन करता म्हणजे हा डाव आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या एका गटाने मंगळवार उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर आंदोलन केले. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात आली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. मात्र, या मातोश्रीवरील या आंदोलनात भाजपचे काही कार्यकर्ते सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरील आंदोलनामागे वेगळा डाव असल्याची शक्यता बोलून दाखवली.
————

विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलाने वहिनीवर टाकला हात

चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माजी आमदार विद्या चव्हाण यांच्या धाकट्या मुलाने थोरल्या सुनेवर हात टाकला, तिचा विनयभंग केला, असा सनसनाटी आरोप चित्रा वाघ यांनी केला. विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी त्यांच्या घरगुती वादात सुनेला फूस लावल्याचा आरोप केला होता. विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांची ऑडिओ क्लिप ऐकवली होती. त्यानंतर लगेचच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्या चव्हाण यांच्यावर तुफान हल्ला चढवला.
———–

 

वरळीत ठाकरे गट वि. मनसेचा राडा

दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले

आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत यांच्यात राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. वरळीतील जांबोरी मैदानात सुरु असलेल्या बांधकामावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले. आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरुन जांबोरी मैदानात बेकायदेशीर काम केल्याचा आरोप मनसेने केला आहे. यावेळी मनसे नेते संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे घटनास्थळी गेले असताना दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची सुरु झाली. या बाचाबाचीनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीही केल्याची माहिती आहे.
———

पवार साहेबांचा पक्ष चोरला

पावसाळी बेडूक’ म्हणत टीका

पुण्यातील दौऱ्यामध्ये राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन अजित पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. पूरग्रस्तांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी, उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं असा टोला लगावल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी सुपारीबहाद्दर म्हटलं. आता या टीकेला मनसेनं थेट अजित पवारांची एक खासदार निवडून आणताना दमछाक झाली. शरद पवारांचा पक्ष तुम्ही चोरला आहे, अशी टोकाची टीका केली आहे. तसेच अमोल मिटकरींवरही निशाणा साधताना त्यांचा उल्लेख ‘टी-शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक’ असा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles