अनिल देशमुख व समित कदम आमनेसामने
समित कदम (Samit Kadam) आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत घरगुती संबंध आहेत. समित कदमच्या पत्नीने फडणवीसांना राखी बांधली आहे. त्यावेळी केवळ राजकीय विरोधकच नव्हे तर त्यांच्या मुलांनाही अडकवण्याचा डाव झाला असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. आता यावर समित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकारणात समित कदम हे नाव सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यांचा प्रस्ताव घेऊन समित कदम हे माझ्याकडे आले होते, असा दावा अनिल देशमुखांनी केला आहे. यानंतर अनिल देशमुखांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे घरगुती संबंध असल्याचा दावाही केला. अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) माझे देवेंद्र फडणवीसांसोबत दाखवलेले फोटो जगजाहीर आहेत. ते सतत तेच फोटो दाखवत आहेत. यातून “देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करणं हा उद्देश आहे”, असे वक्तव्य समित कदम यांनी केले. नुकतंच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.