प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले
काठमांडू (Kathmandu) :- नेपाळची राजधानी काठमांडूत विमान दुर्घटना (Aircraft Crash) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. काठमांडूहून पोखऱ्याला जाणाऱ्या विमानाचा अपघात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती असून विमानात एकूण 19 प्रवासी होते. अपघातानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बचाव पथकाने पाचही प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, काठमांडू पोस्टनुसार, बुधवारी काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचे विमान उड्डाण घेताना रनवेवरून घसरल्याने अपघात झाला.
टीआयएचे प्रवक्ते प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले की, फ्लाइट क्रूसह 19 प्रवासी पोखरा-जाणाऱ्या विमानात होते. सकाळी अकराच्या सुमारास विमान कोसळले. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. अपघातानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
काठमांडू पोस्टनुसार, राजधानीच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात झाला. विमानतळावरील सूत्रांच्या हवाला देत काठमांडू पोस्टने लिहिले की, टेक-ऑफ दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले, त्यामुळे हा अपघात झाला. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते आणि त्यात एकूण 19 प्रवासी होते. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि आकाशात धुराचे प्रचंड ढग पसरले. अपघातामुळे विमानाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे.