Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांची परिषद –
नागपूर पत्रकार परिषदेतील मुद्दे
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे आणि खा.डॉ.श्रीकांत (दादा) शिंदे यांच्या आदेशानुसार आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख श्री मंगेशजी चिवटे यांच्या सूचनेनुसार आरोग्यदूत फाऊंडेशन आयोजित आरोग्य संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या मंगळवारी, दि.९ एप्रिल रोजी गुढीपाडव्यापासून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत, पुरुषोत्तम वायाळ, युवराज काकडे, रूग्णसेवक बाजीराव चव्हाण, आरोग्यदूतचे सहसंपादक भगीरथ तोडकरी यांची विशेष उपस्थिती होती.
गडहिंग्लज ते गडचिरोली, चांदा ते बांदा असणार आरोग्य संवाद यात्रा आरोग्य संवाद यात्रा नागपूर ते मुंबई सह खान्देश, विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई शहर, उपनगरे अशी महाराष्ट्रव्यापी संवाद यात्रा असणार आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत सुरू असलेले आरोग्यविषयक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणे गरजू व गरिब गरजवंतापर्यंत मदत पोहचविण्यास येणारे अडथळे दूर करून मदतकार्य पोहचविण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न वैद्यकीय मदत कक्ष करत आहे. नागपूर येथील आरोग्य संवाद यात्रेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत, आरोग्यदूतचे सहसंपादक भगीरथ तोडकरी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पूर्व विदर्भ प्रमुख सचिन डाखोरे, नागपूर जिल्हाप्रमुख प्रविण शर्मा, वैद्यकीय सहाय्यक नितीन हिलाल यांच्या उपस्थितीत ही आरोग्य संवाद यात्रा सुरू आहे. यात विदर्भातील सर्व पदाधिकारी, रूग्णसेवक, वैद्यकीय सहाय्यकांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या १ वर्ष ९ महिन्यात एकूण २३० कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मंत्रालय, मुंबई कार्यालयामधून तब्बल २११ कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य वाटप मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष नागपूर कार्यालय मधून १९ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वाटप आजवर एकूण २८,०७४ गंभीर रुग्णांचे प्राण वाचले आहेत.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये रुग्णालय अंगीकृत ( empanel ) करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क रुग्णांनी किंवा रूग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करा आणि मदत मिळवा यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवा, आणि स्वतः अर्ज करा.
मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी दिले आहेत. गोरगरीब, गरजू रूग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रूग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. दुर्धर आजारांनी ग्रस्त रूग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मूळ संकल्पना तथा कक्षाचे प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी केले आहे. परिषदेत उपस्थित बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख रामहरी राऊत पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख सचिन डाखोरे जिल्हाप्रमुख प्रवीण बालमुकुंद शर्मा शहर प्रमुख सचिन शर्मा सह समन्वयक आरिफ पटेल उपजिल्हाप्रमुख शशी नाकाडे उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर चड्डी उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी प्रीतीताई भोयर उपशहर प्रमुख महिला आघाडी अश्विनी लीलारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles