पुण्यातील रांजणगाव सांडस येथील धक्कादायक घटना
पुण्यातील रांजणगाव सांडस येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या मृत्यूमुळे शोकव्हिवल झालेल्या पतीने पोलिसांत जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी लागलीच तपासही सुरू केला, मात्र तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. ज्या पतीने खुनाची फिर्याद नोंदवली, तोच खरा खुनी असल्याचे तपासात समोर आल्याने पत्नीच्या मृत्यूमुळे शोकव्हिवल झालेल्या पतीने पोलिसांत जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी लागलीच तपासही सुरू केला, मात्र तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. ज्या पतीने खुनाची फिर्याद नोंदवली, तोच खरा खुनी असल्याचे तपासात समोर आल्याने पोलिसांनाही मोठा धक्का बसला. उच्चशिक्षित पतीने त्याच्या पत्नीचा गळा आवळून खून केला, एवढेच नव्हे तर तिच्या मृत्यूनंतरही तिला इलेक्ट्रिक शॉकही दिल्याते समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील रणपिसे ( 26) या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.