आजपासून खिशावर भार
मुंबईला पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यातच महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किंमतीत वाढ केली असून नवे दर आज, मंगळवारपासून अमलात येतील. सीएनजी (CNG) 1,50 रुपयांनी, तर पीएनजी (PNG) 1 रुपयाने महाग झाले आहे. सीएनजी, पीएनजीच्या दरवाढीने ग्राहकांना वाहन चालवण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी अधिक खर्च येणार आहे. एकाचवेळी दोन्ही इंधन महागल्याने मुंबईकरांच्या खिशावर आता भार येणार आहे.
नव्या दरानुसार, मुंबईकरांना एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये तर घरगुती पीएनजीसाठी ४८ रुपये मोजावे लागतील. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीचे दर कमी असले तरी मुंबईतील बऱ्याच टॅक्सी व रिक्षा सीएनजीवर चालत असल्यामुळे प्रवास महागण्याची शक्यता आहे. तसेच, पीएनजी दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे अंदाजपत्रकही कोलमडू शकते. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किंमतीत वाढ केली असून नवे दर आज, मंगळवारपासून अमलात येतील. सीएनजी दीड रुपयांनी, तर पीएनजी एक रुपयाने महाग झाले आहे.