Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

From BCCI : पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास गिफ्ट

आठ महिन्यांपूर्वी टीम इंडियाला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं. तेव्हा निराश झालेल्या भारतीय संघाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन भेट घेतली होती. तसेच दु:खात असलेल्या भारतीय संघाचं सांत्वन केलं होतं. आता चित्र बदललं आहे. भारतीय संघाने बारबाडोसमध्ये जाऊन भारताचा झेंडा रोवला आहे. टीम इंडियाने 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप (T20 World Cup) जेतेपदावर नाव कोरून मायदेशी परतली.

टीम इंडियाच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. असं असताना भारतीय संघाने दिल्लीत उतरल्या उतरल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यंची भेट घेतली. यावेळी संपूर्ण संघासोबत जवळपास दीड तास चर्चा रंगली. या मुलाखतीचा व्हिडीओ समोर आला असून ट्रेंड होत आहे. दरम्यान बीसीसीआयच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाची जर्सी गिफ्ट देण्यात आली. त्यावर शॉर्टफॉर्म म्हणून नमो लिहिलं आहे. तसेच जर्सीचा क्रमांक 1 दिला आहे.

विजयी भारतीय क्रिकेट संघाने आज आगमनानंतर भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. सर, तुमच्या प्रेरणादायी शब्दांबद्दल आणि #TeamIndia ला तुम्ही दिलेल्या अमूल्य पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. जय हिंद..असं ट्वीट बीसीसीआयने केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles