चंद्रपुर :- अज्ञाताच्या गोळीबारात पूर्वशा सचिन डोहे (27) यांचा मृत्यू झाला आहे. भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे हे त्यांचे पती होत. या गोळीबारात लल्ली नामक आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे.
शहरातील सोमनाथपुर वार्डात रात्री नऊच्या सुमारास अज्ञातानी सचिन डोहे यांच्या घरासमोर हा गोळीबार केला. आवाज आल्याने पूर्वशा घराबाहेर आल्या. यात पूर्वशा यांना दोन गोळ्या लागल्या. एक गोळी थेट छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
जखमी लल्ली याला चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या आरोपी फरारी आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.