Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

राज्यातील ‘या’ भागात आज पावसाचा यलो अलर्ट

देशभरात मान्सून सक्रीय झाला आहे. परंतु काही राज्यांमध्ये पाऊस नाही तर काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात यलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरुणाचल प्रदेश, आसम आणि मेघालयात 4 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगाल, सिक्किम, नगालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये 05 जुलैपर्यंत तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकात 6 जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

सध्या राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी लागल्याचे पाहायला मिळत आहे. कुठं जोरदार पाऊस होतोय, तर कुठं मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे.ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं  दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणसह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक जिल्ह्याला आँरेज अलर्ट बुधवारी दिला आहे. तसेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, रत्नागिरी, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. राज्यातील अनेक भागांत बुधवारी पाऊस सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles