Sunday, June 22, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

बापरे, पाणीपुरीने कॅन्सरचा धोका

FSSAI च्या अहवालाने खळबळ

रस्त्यांवरील खाद्य पदार्थांसह आलिशान हॉटेलातील खाद्यपदार्थांचे नमूने तपासले. अनेक नमूने तर खाण्यालायकही नव्हते. त्यावर बुरशी देखील सापडली असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे.
पाणी पुरीचे नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते, परंतू पाणीपुरी खाल्ल्याने कॅन्सरचा धोका असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचे झाले काय कर्नाटकात खाद्य पदार्थांचे नमूने प्रयोगशाळेत तपासण्यासाठी नेण्यात आले तेव्हा त्या पाणी पुरीच्या पाण्याची देखील तपासणी करण्यात आली. यात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला ( FSSAI ) त्यांच्या तपासणीत कॅन्सर सारख्या आजारांना आमंत्रण देणारे घटक सापडले आहेत. एकूण 260 जागांवरुन पाणीपुरीचे नमूने गोळा करण्यात आले होते. त्याच्या तपासणीत धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे.

कर्नाटकातील पाणीपुरी विक्री करणाऱ्या दुकानांवर धाड घालण्यात आली होती. त्यावेळी FSSAI केलेल्या तपासणीत 260 जागी पाणीपुरीचे नमूने घेतले. यात 41 नमून्यात नकली रंग आणि कॅन्सरला आमंत्रण देणारे घटक सापडले. यातील 18 नमूने तर इतके खराब होते. ते खाण्यालायक नव्हते. कर्नाटकातील विविध ठिकाणी रस्त्यावर पाणीपुरी आणि इतर खाद्यपदार्थातील अस्वच्छतेचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कमिशनर श्रीनिवास के.यांनी एका वृ्त्तपत्राला सांगितले की आम्ही रस्त्यांवरील खाद्य पदार्थांसह आलिशान हॉटेलातील खाद्यपदार्थांचे नमूने तपासले. अनेक नमूने तर खाण्यालायकही नव्हते. त्यावर बुरशी देखील सापडली. कर्नाटकातील नमूने तपासण्यात आले तेव्हा पाणीपुरीच्या सॅम्पल रोडामीन-बी फूड कलर प्रतिबंध लावण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles