नागपूर:- रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्राच्यावतीने 26 जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोध दिवस, निमित्य व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम, जिल्हा न्यायालय येथे नुकताच घेण्यात आला. रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र द्वारा जिल्हा वकील संघटन, नागपूर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, 26 जून, जागतिक अंमली पदार्थ विरोध दिवस साजरा केला गेला. कार्यक्रमाचे सचिन पाटील,सचिव, जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष होते.
प्रमुख अतिथी केंद्राच्या संचालिका प्रांजली ताल्हन (वांढरे) हे होते. ज्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख उपस्थिती न्यायाधिश (जे.एम.एफ.सी.) एस.बी.मांढवे, एन.के.वानखेडे हॆ होते. तसेच प्रमुख उपस्थितीत ॲड. रोशन बागडे (अध्यक्ष, जिल्हा वकील संघटन, नागपूर), अड.मनीष रणदिवे (महासचिव, जिल्हा वकील संघटन, नागपूर), केद्राचे सचिव सुरेश वांढरे, ॲड.समिक्षा गणेशे (कार्यक्रम आयोजक) ॲड. वासुदेव कापसे, ॲड. आशिष नागपुरे आणि मुख्य मार्गदर्शक डॉ.संजय सुद हे होते. डॉ.सुद यांनी वाढत्या व्यसनाच्या समस्येचे गांभीर्य मांडून त्यावरील उपाययोजना स्पष्ट केले.
तसेच व्यसनांबाबतचे भ्रम दूर केले. कार्यक्रमांचे संचालन रिफ्रेश केंद्राचे समुपदेशक, अनंत घुलक्षे यांनी करून व्यसनांमुळे निर्माण झालेल्या सामाजिक आरोग्याच्या प्रश्नांबद्दल सर्वांचे लक्ष वेधून जनजागृतीचा उद्देश पूर्ण केला.यामध्ये शेकडो वकील, तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. आभार ॲड.उषा गुजर यांनी मानले.