देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
नागपूर :- नागपूर येथील दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंग योजनाला आंबेडकरी अनुयायांनी तीव्र विरोध करीत आज जोरदार आंदोलन केले.त्यानंतर सरकारला जाग येत सरकारने या बांधकामाला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले.जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणा स्थान असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी अनुयायांनी केलेला विरोध पाहून सरकारने या बांधकामाला स्थगिती देत असल्याचे विधीमंडळात जाहीर केले. नागपूरच्या दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंग योजनेमुळे येथील स्तूपाला धक्का पोहचू शकतो त्यामुळे या पार्किंग विरोध करण्यासाठी सोमवारी दुपारी नागपूर येथे मोठे आंदोलन झाले. त्यानंतर येथे प्रचंड मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. अनेक राजकीय पक्षांनी या भूमिगत पार्किंगला विरोध केला आहे. त्यानंतर उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्किंगच्या कामाला स्थगिती देत असल्याचे विधीमंडळात या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.