मुंबई (Mumbai) :- महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक(Sujata Saunik) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून या राज्याच्या विकासात राजकीय व्यक्तींच्या बरोबरीने प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकाऱ्यांनी आपले बहुमोल योगदान दिले. परंतु राज्याच्या मुख्य सचिव पदी आजवर महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नव्हती, आज सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीने महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय पदी एक महिला विराजमान होत आहे, या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे.
सुजाता सौनिक यांना त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्र राज्याची जास्तीत जास्त सेवा घडो ही सदिच्छा.
एकच सांगेन ही ताकद संविधानाने दिलेली आहे.
संविधान जिंदाबाद.