Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

एका दगडात दोन शिकार, अफगाणिस्तानने रचला इतिहास !

इकडे बांगलादेशला हरवलं, तिकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर ढकललं

आज टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत (T20 World Cup 2024) अफगाणिस्तानने बांगलादेशचा (Afghanistan vs Bangladesh) पराभव करत इतिहास रचला आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. डकर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशचा 08 धावांनी पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा अफगाणिस्तान हा चौथा संघ ठरला. अफगाणिस्तानच्या विजयासह ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आहे.

टी-20 विश्वचषकात सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात होता. अफगाणिस्तानने या विश्वचषकात युगांडाविरुद्ध विजय नोंदवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा, पापुआ न्यू गिनीआ आणि ऑस्ट्रेलियाता पराभव केला होता. आज हीच विजयी घोडदौड कायम ठेवत अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केले. अफगाणिस्तानने एका दगडात दोन शिकार केल्याचं बोललं जात आहे. आता अफगाणिस्तानचा संघ 26 जून रोजी उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.

अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खान आणि नवीन उल हक यांनी सर्वाधिक 4-4 विकेट्स घेतल्या. याशिवाय फजलहक फारुकी आणि गुलबदीन नायब यांना प्रत्येकी 1 विकेट घेतली. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी 59 धावा जोडल्या. मात्र यानंतर विकेट्सची रांग लागली. रहमानउल्ला गुरबाजने 55 चेंडूत 43 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर इब्राहिम झद्रानने 29 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले. मात्र, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने शेवटच्या षटकांमध्ये 10 चेंडूत 19 धावा देत शानदार पूर्ण केले. अशा प्रकारे अफगाण संघाने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 115 धावा केल्या. बांगलादेशकडून रिशद होसेन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. रिशाद हुसैनने 4 षटकात 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles