Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

पुणे हादरले! या कारणामुळे मुलाच्या वडिलांना संपविले

 

पुणे(Pune) :- बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून प्रेयसीच्या भावाने प्रियकरांच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. कटाळू कचरू लहाडे असे मृत व्यक्तीचे नाव असून पुण्यातील  येरवडा भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीचा भाऊ इस्माईल शेख  (25 वर्षे) याला ताब्यात घेतले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील येरवडा भागात ही  धक्कादायक घटना घडली आहे.  लहाडे व शेख कुटुंबीय एकाच परिसरात वास्तव्यास आहे. कटाळू यांचा मुलगा आणि इस्माईल याची बहिण या दोघांमध्ये मैत्री होती. आज सकाळी कटाळू यांचा मुलगा व संबंधित तरुणी घरातून निघून गेले. बहिणीला कटाळू यांच्या मुलानेच पळवून नेल्याचा संशय इस्माईल याला आला. त्या रागातूनच आज कटाळू याच्यावर इस्माईल याने रागातून धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने बहिणीला फूस लावून पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागतून मुलीच्या भावाने टोकाचे पाऊल उचलले आहे. तरुणीचा भाऊ इस्माईल शेखने कोयत्याने सपासप वार केले आहे. लहाडे उभे असताना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने लहाडे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये लहाडे यांच्या डोक्याला आणि हातावर वार केल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मृत लहाडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे. एकीकडे कोयता गँग, ड्रग्ज प्रकरणाने पुण्याचे वातावरण तापले असताना या भयंकर घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles