धुळे 22 जून:- शहरातील कैलास नगरमध्ये चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोड्या करुन मुद्देमाल लंपास केला. या चोर्यांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंगल गणपत उमाळे (६८) या पालघर येथे गेलेल्या असतांना शुक्रवारी रात्री त्यांच्या घरातील कपाटातून चोरांनी दोन तोळ्याचे सोन्याचे मणी, चांदी व अडीच हजाराची रोख रक्कम लांबविली. आज सकाळी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
तर दुसरी घटना कैलास नगरातील सुरेश भावसार यांच्या घरी झाली. अज्ञात चोरांनी भावसार यांच्या घरातील कपाटातून सुमारे ३ ते ५ हजाराची रोकड लांबविली. भावसार हे कटलरीचा व्यवसाय करतात तर मंगल उमाळे या बाजार समितीमध्ये काम गस्ती पथक बेपत्ता, पथदिवेही बंद कैलास नगरात झालेल्या घरङ्गोड्यांमुळे परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे सावट पसरले आहे. परिसरात पथदिवे बंद असतात, रात्री अंधाराचे साम्राज्य असल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळते. त्यात पोलीसांचे गस्ती पथक ङ्गिरकत नसल्याचा आरोप परिसरातील नागरीकांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.