Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

राज्य सरकार विरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

 

डोंबिवली (Dombivli) २१ जून:- महापुरुषांचा अपमान, जाती धर्मात तेढ, पेपरफुटी आदी मुद्द्यांविरोधात शुक्रवार 21 तारखेला कल्याण शहरात कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर करण्यात आलेल्या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी करत महायुती सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर चिखलफेक आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडले.

या आंदोलनात कल्याण शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे शुक्रवारी तहशीलदार कार्यालय येथे महायुती सरकारच्या विरोधात ”चिखलफेक” आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी नागरी विकास सेलचे प्रदेश प्रमुख नविन सिंग, कल्याण शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पोटे, महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी, सेवा दलचे अध्यक्ष लालचंद तिवारी, मुन्ना तिवारी यांस अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्रात भाजपा सरकार तर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. देशातील शेतकरी, समान्य माणसे, विद्यार्थी यांच्या छळ होतोय. शेतकऱ्यांना योग्य पीक भाव मिळत नाही. पेपर फुटीचे प्रकरण वाढले आहे. नीटच्या परीक्षेतील गोंधळ होणे, पेपर फुटणे हे विद्यार्थी व पालकवर्गाला त्रासदायक आहे. त्यामुळे जनसामान्यसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार कल्याणात राज्य सरकारचा विरोध म्हणून यावेळी काँग्रेस पक्षातर्फे महायुती सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर चिखलफेक करून निषेध व्यक्त करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी नागरी विकास सेलचे प्रदेश प्रमुख नविन सिंग यांनी सांगितले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश काँग्रेस सदस्य मुन्ना तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रवीण साळवे, शकील खान यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles