Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

४८ लाख विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत

सोलापूर 17 जून :- शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश व पुस्तके’ शासनाच्या या धोरणाला यंदा खो बसला आहे. शाळा सुरू झाली, पण जिल्हा परिषदांसह नगरपालिका, महापालिकांच्या शाळांमधील ४८ लाख चिमुकल्यांना गणवेशाविनाच शाळेत यावे लागले. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (मआविम) शाळांचा नियमित गणवेश शिलाई करून घेतला जात असून आतापर्यंत ‘मआविम’ला केवळ सहा जिल्ह्यांतील नऊ लाख विद्यार्थ्यांचेच कापड मायक्रो कटिंग करून मिळाले आहे. अद्याप ३० जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कापड मिळालेले नाही.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील ५० लाख विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागातर्फे प्रत्येकी दोन गणवेश (स्काऊट गाइड व शाळेचा नियमित) मोफत मिळणार आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश शिलाईचे काम सुरू आहे. महामंडळाच्या ६० हजार महिलांच्या हाताला यातून काम मिळाले आहे. आम्ही लवकरात लवकर गणवेश शिलाई करून देत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles