Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Three arrested :बळी देणाऱ्या बोकडावर लिहिले राम

मुंबई (Mumbai)17 जून:- आज देशभरात बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अशातच मुंबईत बळी देण्यासाठी आणलेल्या एका बोकडावर राम लिहिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलिसांनी कारवाई करत तीन जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद शफी शेख, साजिद शफी शेख आणि कुय्याम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांनी मटणाचे दुकानही सील केले आहे.

दुकानात 22 बकरे कुर्बानीसाठी आणले होते. मात्र, त्यातील एका बकऱ्यावर धार्मिक नाव लिहिले होते. सोशल मीडियावर या बकरीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीवरून सीबीडी बेलापूर पोलिसांनी कारवाई करत धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles