अमरावती : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याने भाजपतर्फे शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.अमरावती शहरातील राजकमल चौकात शपथविधीचे लाईव्ह प्रसारणाचे आयोजन भाजपतर्फे करण्यात आले होते. तर नवाथे चौकात तुषार भारतीय मित्र मंडळातर्फे भव्य आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुलाल उधळून तसेच डीजेच्या तालावर फेर धरत सर्वांनी जल्लोश केला.
राजकमल चौकात संध्याकाळी भाजप कार्यकर्ते एकत्र झाले होते. शपथविधी सोहळा सुरु होण्यापुर्वी गुलाल उधळण्यात आला. उड्डाणपुलावर तिरंगा लाईटींग रोशनाई करण्यात आली होती. संध्याकाळी ७.२५ वाजता टीव्ही स्क्रीनवर शपथविधी समारंभ सुरु होताच मोदी मोदीचा जयघोष करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची अफजलखानवधाची प्रतिमा, रामललाची प्रतिमा, तसेच खुब लडी मर्दानी असलेला माजी खा नवनीत राणा यांचा फोटोसह शहराध्यक्ष, आ प्रवीण पोटे यांचा कटआऊट येथे दिसून आलेत. यावेळी मोतीचूरचे लाडू, पेढे आणि मिठाईचे वाटपही करण्यात आले. सायंकाळी ५ वाजतापासूनच राजकमल चौकात भाजप कार्यकर्त्यांची गर्दी सुरू झाली. अनेकांनी ढोल-ताशांच्या निनादात गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. भाजपचे शिवराय कुळकर्णी, किरण पातुरकरसह अन्य अनेक पदाधिकाऱ्यांनी राजकमल चौकात भव्य एलएडी स्क्रीन वर नरेंद्र मोदींच्या शपथविधीच थेट प्रसारण केले.(The swearing-in ceremony of Narendra Modi was telecasted live)
मै नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ घेण्यास सुरुवात होताच एकच जल्लोष राजकमल चौकात करण्यात आला.(Jubilation was done at Rajkamal Chowk.)या जल्लोषात युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते.मात्र कुठेतरी अमरावती लोकसभेची जागा भाजप हरल्यामुळे युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत होती मात्र देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच झाल्यामुळे सर्व कार्यकर्ते एकत्र येत जोरदार जल्लोष साजरा केला.यावेळी भाजपा महिला पदाधिकर्यांनी सुद्धा जल्लोष साजरा करीत जय श्रीराम च्या जोरदार घोषणा दिल्यात या वेळी महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळत जल्लोष साजरा केला.
तर भाजपाच्या दुसऱ्या एका गटाने तुषार भारतीय यांच्या नेतृत्वात शहरातील नवाथे चौकात जल्लोष साजरा केला.एकंदरीत पाहल तर रविवार ची सायंकाळ ही अमरावती शहरात संपूर्ण मोदी मय झाली होती.यावेळी राजकमल चौकात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, अॅडप्रशांत देशपांडे, माजी अध्यक्ष किरण पातुरकर, प्रा. दिनेश सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ता लप्पी उर्फ चंद्रकुमार जाजोदिया, शिवसेनाचे नानकराम नेभनानी, अरुण पडोळे, प्रवीण विधाते, अॅड वासुदेव नवलानी, संजय नरवणे, चेतन पवार, निवेदिता चौधरी, जीतू दुधाने, सुरज मिश्रा, राजु मेटे, मोहनलाल मंधानी, मुकेश बडोणे, श्रीकांत धानोरकर, सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
नवाथे चौकातही जल्लोश : राजकमल चौकाप्रमाणे नवाथे चौकात येथे तुषार भारतीय मित्र परिवाराच्या वतीने जल्लोश करण्यात आला. येथे मोठा एलईडी लावण्यात आला होता. लाडु, पेढे वाटण्यात आले. फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे प्रसारण करण्यात आले. शहरातील विविध प्रमुख भागात, चौकात भाजपतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तुषार भारतीय, चेतन गावंडे, प्रशांत शेगोकर, रेखा भुतडा, सुनंदा खरड, प्रणितसोनी, लता देशमुख, शुभम वैष्णव, सुधीर पावडे, प्रणीत सोनी, राजेश जगताप, मंदार नानोटी, रोहित काळे, तुषार चौधरी, देवचंद शेंडे, अजय राऊत, प्रताप तिडके, अलका सप्रे, नरेंद्र माणेकर, डॉ प्रताप तिडके, अनंत गावंडे, देवा शेंडे, प्रफुल गांधी, विवेक पांडे, सुधीर पावडे,, दिलीप मुदलीयर, अजय राऊत, साहेबराव तिडके, आशिष अडसड, बंडू विघे, गजानन लेंडे यांनी जयघोष केला.