कार्यात विचार आणि ध्येय स्पष्ट हवे
चिपळूण : समाजासाठी कार्य करताना ध्येय आणि विचारांची स्पष्टता असणे आवश्यक आहे, त्या दिशेने व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी संघात प्रशिक्षणाची योजना असल्याचे प्रतिपादन कोकण प्रांताचे संघचालक अर्जुन चांदेकर यांनी केले. चिपळूण येथे आयोजित संघ शिक्षा वर्गाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी नागरी कर्तव्याची जाणीव करून देताना ते म्हणाले की, आपण संविधान स्वतः अंगीकृत करून स्वतः प्रती अर्पण केले आहे. ज्या देशाचे लोक सर्वोत्तम आहेत तो देश सर्वोत्तम आहे. नियम केवळ भीतीपोटी न पाळता तो आपला स्वभाव बनला पाहिजे.आपल्यामुळे इतर कोणाच्याही अधिकारांना धक्का लागणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.
सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हे आपले इष्ट कर्तव्य आहे. गेल्या 24 मे पासून चिपळूण येथे सुरू (Started at Chiplun from last 24th May) असलेल्या या 15 दिवसांच्या वर्गात शासकीय गोवा आणि कोकण प्रांतातील 16 ते 40 वर्षे वयोगटातील 169 शिक्षार्थीनीं मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, या प्रशिक्षण वर्गात व्यक्तिमत्व विकासासाठी सकाळी 4.30 ते 10.30 या वेळेत शारीरिक विकासासाठी मैदानी कार्यक्रम, लाठी-काठी, नियुद्ध, योगा, व्यायाम,तसेच बौद्धिक विकासासाठी विविध विषयांवर चर्चा, संवाद तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यावहारिक प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम आखण्यात आले होते.
या प्रशिक्षण वर्गाचा समारोप समारंभ शनिवारी सायंकाळी 6 वाजता युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे आयोजित करण्यात आला होता.यावर्गात शिक्षार्थ्यांनी जे काही प्रशिक्षण घेतले त्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या समारंभात विशेष अतिथी म्हणून डॉ.श्रीमती सुवर्णा पाटील, मेडिकल डायरेक्टर बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, मुख्य वक्ते श्री.अर्जुन चांदेकर, संघचालक कोकण प्रांत , सतीश टोपरे संघचालक उत्तर रत्नागिरी जिल्हा, डॉ अच्युत पाल सर्वाधिकारी उपस्थित होते.