Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Wardha : बँकेने दिलेल्या कर्जाची नियमित परतफेड करा

वर्धा : जिल्ह्यात सहकारचा पाया भक्कम आहे. बंद पडलेल्या सहकारी बँकेला गत वैभव प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाटचाल अधोगती ते प्रगतीच्या दिशेने सुरू झाली आहे. बँकेच्या कर्ज परतफेडीबाबत असलेल्या अनास्थेमुळे बँक बुडते. त्यामुळे कर्जदारांनी बँकेने दिलेल्या कर्जाची नियमित परतफेड करण्याचे आवाहन सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केले.

अनुप कुमार पुढे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज विशेष दिवस आहे. बारा वर्षानंतर पुन्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप होत आहे. बंद पडलेल्या बँकेला पुनरुज्जीवन प्राप्त झाले असून इतर जिल्ह्यात बंद असलेल्या सहकारी बँकाना सुरू करण्यासाठी वर्धा मॉडेल राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले, प्रामुख्याने आपला जिल्हा कृषीप्रधान आहे. जिल्हात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक(District Central Cooperative Bank) जीवनवाहीनी म्हणून काम करते. बँक जरी सुरू झाली असली तरी स्पर्धेच्या युगात मोठी आव्हाने बँकेपुढे आहेत. त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे म्हणाले, बँकेमार्फत कर्ज वाटप ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. परंतु, बारा वर्षापासून बंद असलेल शेतकऱ्यांना कर्ज वाटप सुरू झाले हा अत्यंत महत्वाचा दिवस बँकेसाठी आहे. सहकार क्षेत्रातील बँकांना अडचणीच्या काळात सभासद, ठेवीदार, खातेदार तसेच सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक दिलीप दिघे म्हणाले, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्रशिक्षण, माहिती तंत्रज्ञान आदींची सोय उपलब्ध करुन देईल. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पालकत्व स्विकारत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

अपर निबंधक शैलेश कोतमिरे, संतोष पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी खरीप हंगामासाठी प्रातिनिधीक स्वरुपात शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले तसेच सर्वाधिक ठेव ठेवणारे ठेविदार, सहकार विभागाचे कर्मचारी, बँकपातळीवर शंभर टक्के वसुली असलेल्या संस्थांचे चेअरमन आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles