रशियातील सेंट पीटर्सबर्गजवळ नदीत बुडून चार भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांन लवकरात लवकर परत करण्यासाठी येथील भारतीय मिशन रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कातआहे.हे चारही विद्यार्थी वेलिकी नोव्हगोरोड शहरात असलेल्या नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. यामध्ये १८ ते २० वर्षे वयोगटातील दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश होता. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एक भारतीय विद्यार्थिनी वोल्खोव्ह नदीत किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर गेली होती आणि तिच्या चार वर्गमित्रांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती बुडू लागली. वृत्तानुसार, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आणखी तीन विद्यार्थी नदीत बुडाले. एका मुलाला स्थानिक लोकांनी सुखरूप बाहेर काढले.
मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “आम्ही मृतदेह लवकरात लवकर कुटुंबांना परत करण्याचा प्रयत्न करत आहोत. Indian students death in Russia ज्या विद्यार्थ्याचा जीव वाचला त्याच्यावर योग्य उपचार करण्यात येत आहेत. सेंट पीटर्सबर्ग येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, विद्यार्थी वेलिकी येथील नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. “शोक झालेल्या कुटुंबांप्रती आमची संवेदना, त्यांनी पुढे लिहिले कौन्सुलेट जनरल म्हणाले, दुकतग्रस्त कुटुंबांशी संपर्क साधण्यात आला आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.