Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Even in the heat of the day:पोलिसांनी बजावले चोख कर्तव्य

मतमोजणी बंदोबस्तासाठी राबली खाकी

अमरावती:- अमरावती लोकसभेसाठी मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवन येथील शासकीय इमारतीत मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता; मात्र, रात्रंदिवस कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना उभे राहण्यासाठी किंवा सावलीत बसण्यासाठी फारसी व्यवस्था केली नव्हती, त्यामुळे भर उन्हात रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या पोलिसांचे हाल झाल्याचे दिसून आले (It was seen that the condition of the policemen standing on the side of the road in the hot sun). मात्र, भर उन्हातही कोणतीही कुरकुर न करता पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले.अमरावती लोकसभा मतमोजणीसाठी जवळपास 1500 पोलिस तैनात केले असून, सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणीच्या आदल्या दिवसापासून पोलिस बंदोबस्त होता. यात स्थानिक पोलिसांसह बाहेरून विशेष पोलिसांची कुमक पाचरण करण्यात आली होती.

मात्र, मतमोजणी बंदोबस्तात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्याआरोग्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना दिसली नाही. त्यामुळे उन्हातान्हात उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावलीचा आसरा घेतल्याचे चित्र दिसले. तर काही पोलिसांना दिवसभर सावलीच मिळाली नाही. त्यामुळे फिरत्या शौचालयाच्या गाडीजवळ बसण्याची वेळ आली. दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी उकाडा मात्र कायम होता. कसलीही व्यवस्था नसताना व झाडांची सावली नसतानाही पोलिसांनी कर्तव्य बजावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles