Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Amravati – काँग्रेस उमेदवाराच्या विजयी जल्लोषात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या

 भाजपातर्फे पोलिस आयुक्तांना निवेदन

अमरावती : मंगळवारी अमरावती लोकसभा मतदार संघाचा निकाल घोषित झाला. यावेळी भाजपा उमेदवाराचा पराभव करून महाविकासचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी विजयश्री येचून आणली त्यानंतर शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमरावती शहरात सर्वत्र जल्लोष साजरा केला. हा जल्लोष साजरा करतांना विशिष्ट समाजाच्या समाज कंटकांनी हिंदू धर्मियांवर अश्लिल हावभाव व हातवारे केलेत तसेच भाजपच्या पराभूत उमेदवार नवनीत राणा यांना अश्लिल शब्दात नारे देऊन राजकमल चौकातील रस्त्यावर, दुकानात पिवळी माती फेकून हिंसक घोषणा देऊन अनेक व्हिडीओ प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित केले आहे.या समाजविघातक घटनेमुळे हिंदू धर्मियांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या आहेत.आज या समाजकंटकांमुळे अमरावतीकर जनताप्रचंड दहशतीमध्ये आहेत. तरी या दंगा भडकविणाऱ्या समाजकंटकावर व्हिडीओ व सीसीटीव्ही तपासून तात्काळ कठोर कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देईल, असे निवेदन अमरावती भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आमदार प्रविण पोटे पाटील यांच्या नेतृत्वात आणि शहर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज आयुक्त, पोलिस आयुक्तालय अमरावती यांना निवेदन दिले.(A statement was given to Police Commissionerate Amravati.)याप्रसंगी आमदार प्रविण पोटे यांनी आक्रमक भूमिका जाहीर केली असून विजय पराजय हा नियतीचा भाग आहे.

जसा पराभव स्विकारल्या जातो तसाच विजय सुध्दा पचविता आला पाहिजे. जर हिंदू सहिष्णूता राखतो तसाच समोरच्या धर्मियांनी सुध्दा दुसऱ्या धर्माचा सन्मान राखला गेला पाहिजे. जर पोलिसांनी याची वेळीच दखल घेतली नाही तर याचे गंभीर परिणाम होतील असे आ. प्रवीण पोटे पाटील पोटें म्हणालेतयावेळी भाजपा पदाधिकारी किरण पातुरकर, दिनेश सूर्यवंशी, नितीन धांडे, अॅड. प्रशांत देशपांडे, शिवराय कुळकर्णी, चेतन पवार, सचिन रासने, रूषीकेश शर्मा, सिध्दार्थ वानखडे, जयंत डेहनकर, विवेक कलोती, प्रा. रवि कोल्हे, प्रशांत शेगोकर, सतीश करेसीया, लखनराज, अनिता राज, राजेश पड्डा, सुधीर बोपुलकर,किरणताई महल्ले, सुरेखाताई लुंगारे, सुनंदाताई खरड, पोपली, प्रणित सोनी, भूपेंद्र ठाकूर, गंगाताई खारकर, लताताई कोल्हे, शिल्पाताई पाचघरे, प्रशांत शेगोकर, सतीश करेसीया, लखनराज, अनिता राज, राजेश पड्डा, सुधीर बोपुलकर, यांचेसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

ते काँग्रेस चे कार्यकर्ता नाही – डॉ. सुनील देशमुख

काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांची विजयी मिरवणूक निघाल्यानंतर राजकमल चौकात त्या मरवणुकी मध्ये काही समाज कंटकांनी जे हावभाव , हातवारे केले आहे त्याचा आपण त्रिव निषेध व्यक्त करतो. लोकशाही मध्ये हार जीत हि होतच असते मात्र कोणत्याही महिलेच्या बाबतीत असे हावभाव करणे चुकीचे आहे मी अमरावती शहरात गेल्या २५ ते ३० वर्षांपासून राजकारण करतो आहे मात्र तो व्यक्ती कधीही काँग्रेस चा कार्यकर्ता म्हणून माझ्या डोळ्यासमोर आलेला नाही आणि काँग्रेस चा कार्यकर्ता म्हणून आपण त्याला ओळखत सुद्धा नाही. माझ्या मते हा युवक रस्त्यावरचा कोणी व्यक्ती आहे त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे. व या शहरात शांतता हि कायम राहिली पाहिजे. तशीच माझी सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे कि आपण निवडून आली म्हणून त्याच्या उन्मात करणे चुकीचे आहे. मागच्या चार वर्षात माजी खासदार नवनीत राणा यांनी मुस्लिम नागरिकांना ज्या प्रमाणे उत्तेजित केले त्यांच्या बद्दल जी वक्तव्य होती,हातवारे होते त्याची हि रिएक्शन म्हणून त्या व्यक्तीने ते केले असले तरी ते आम्हला मेनी नाही याचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजप चे ध्येय असते कि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन शहरातील शांतता भंग व्हाव्ही अश्या गोष्टीमुळे त्याला खतपाणी मिळते. आपण या घटनेचा जाहीर निषेध करून त्याला जेल मध्ये टाकावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles