Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

All four Lok Sabhas : मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मुंबई:  लोकसभा सार्वत्रिक निव़डणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठीची मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून येत्या 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, आणि 29- मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी नेस्को सेंटर, गोरेगाव येथे, तर 28- मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघाची मतमोजणी उदयांचल शाळा, विक्रोळी येथे होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली आहे.

सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार आहे. सुरुवातीला टपाली मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी 8-30 वाजता मतदान यंत्राद्वारे मतमोजणीस सुरुवात होणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करताना त्यातील समाविष्ट विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी केली जाईल. यामध्ये प्रत्येकी 14 टेबलवर ही मतमोजणी सुरु होईल. यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच मतमोजणी केंद्र आणि परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॅानिक डिव्हाईस गॅझेटस तसेच मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रात ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्रात येताना उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी यांनी त्यांना दिलेले ओळखपत्र सोबत बाळगावे, असे आवाहन करण्यात आले आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles