Six Terrorists Killed in Kashmir: ऑपरेशन सिंदूरनंतरही (Operation Sindoor) भारतीय लष्कराकडून दहशतवादाच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. मागच्या ४८ तासांत सुरक्षा दलाने त्राल आणि शोपियानमध्ये राबविलेल्या दोन मोहिमांमध्ये सहा दहशतवादी मारले गेले आहेत. काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक व्हीके बिर्दी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सुरक्षा दलाच्या कारवाईबाबतची माहिती दिली. सीआरपीएफ, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलीस यांनी संयुक्तपणे राबविलेल्या दहशतवादी (Terrorist) विरोधी मोहिमेला मोठे यश आल्याचे बिर्दी यांनी सांगितले.
अवंतीपुरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बिर्दी म्हणाले की, काश्मीरमधील दहशतवादाला चाप बसविण्यासाठी सुरक्षा दलाची समन्वय बैठक सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. सीआरपीएफ, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्यातून मागच्या ४८ तासांत दोन ऑपरेशन्स राबविण्यात आली. ज्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.\
काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शोपियान आणि त्राल येथील दोन ऑपरेशन्समध्ये सहा दहशतवादी ठार करण्यात आम्हाला यश आले आहे, असेही बिर्दी म्हणाले.